Maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींची जहरी टीका

Raju Shetti Political News Updates: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम करत असल्याचे म्हणत राजू शेट्टींनी टीका केली आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्यात सत्ताधाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेसाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना मासिक १५०० रुपयांची रक्कम मिळत आहे. या योजनेच्या राज्यातील अनेक महिला लाभार्थी ठरल्या आहेत. एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी विविध कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे कोल्हापूर आणी सांगलीतील शेतकऱ्यांना त्यांच्याशी संबंधित योजनेचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याचे समोर आले आहे. यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणीचे कुंकू पुसण्याचे काम करत आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी एका पोस्टद्वारे केली आहे.

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी दुसऱ्या हप्त्यांची गेल्या दहा महिन्यांपासून वाट पाहत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मदतीने दहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचं मान्य करण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री आणि कारखानदार हे दोघेही शेतकऱ्यांना शंभर रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्रातले कारखानदार मांडीला मांडी लावून बसत आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करून लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

तिसऱ्या आघाडीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका काय?

माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी नवी दिल्लीत राज्यातील तिसऱ्या आघाडीवर भाष्य केलं. राजू शेट्टी म्हणाले, ' प्रत्येक मतदारसंघात सगळ्या संघटनांनी मिळून एक उमेदवार द्यावा ही चर्चा झाली आहे. आपली ताकद दाखवून देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात मी, वामनराव चटप, शंकर धोंडगे आम्ही तिघांनी बैठक घेतली. त्यानंतर एक व्यापक परिवर्तन आघाडी तयारी करणार आहोत. आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापासून नेहमीच फारकत घेऊन निवडणूक लढवत असतो. तिसऱ्या आघाडीसाठी आमची इतर सगळ्या पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. पण त्याला मूर्त स्वरूप आलं नाही. बचू कडू यांच्याशी देखील आमची चर्चा सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT