Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक

Kalyan Titwala Accident News : टिटवाळा परिसरात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कंटेनरने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.
Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक
Kalyan Titwala Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • टिटवाळ्यात भरधाव कंटेनरची १० ते १५ वाहनांना धडक

  • चुकीच्या दिशेने येत असल्याचा आरोप

  • मोठी जीवितहानी टळली

  • नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण जवळील टिटवाळा परिसरात आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने तब्बल दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. दैव बलवत्तर म्हणून मोठी जीवित हानी टळली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी अपघातानंतर कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चुकीच्या दिशेने येत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांना त्याची धडक बसली. काही क्षणांतच अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच घटनास्थळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून कंटेनर चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com