मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Raj Thackeray And Eknath Shinde Meeting Details: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट घेतली. महापालिका निवडणुकांनंतरची ही पहिली भेट असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे येथील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीची भेट होती. ठाकरे बंधु एकत्र आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र निकाल लागल्यानंतर कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये मनसेने शिंदे गटाला पाठिंबा देत सत्तेत स्थापन होण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशातच आज शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com