CM Eknath Shinde : बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित, सरकारला बदनाम करण्याचा डाव; मुख्यमंत्री शिंदेंनी पुरावाच सांगितला, VIDEO

CM Eknath Shinde on badlapur agitation Case : बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित असून विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डाव होता, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
 बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित, सरकारला बदनाम करण्याचा डाव; मुख्यमंत्री शिंदेंनी पुरावाच सांगितला
CM Eknath Shinde :Saam tv
Published On

सातारा : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून मंगळवारी आंदोलकांचा आक्रोश दिसून आला. ठाणे जिल्हाधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलक आंदोलनावर ठाम होते. आंदोलकांनी ८ ते ९ तास रेल्वे रोखून ठेवली होती. यावेळी आंदोलकांचा लाडकी बहीण योजनेच्या विरोधातही सूर दिसला. याच आंदोलनावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित होते. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी एक दिवसांच्या सातारा दौऱ्यावर होते. सातारा दौऱ्यानंतर ते रत्नागिरीला जाणार आहेत. रत्नागिरीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ही घटना खूपच दु:खद आहे. चिमुकल्यांसोबत घडलेली घटना दुर्देवी आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याच्यावर कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात कठोरातील कठोर कलम लावण्यास सांगितलं आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे. तसेच एसआयटी नेमली आहे. पोलिसांवरही कारवाई केली आहे'.

 बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित, सरकारला बदनाम करण्याचा डाव; मुख्यमंत्री शिंदेंनी पुरावाच सांगितला
Badlapur News : बदलापुरातील तब्बल 300 आंदोलकांवर गुन्हे, आतापर्यंत 28 जणांना अटक; परिसरात तणावपूर्ण शांतता

'सरकार पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांच्या मागे आहे. संस्थाचालकाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेनंतर मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली आहे. ज्या शाळेत मुली शिक्षण घेत आहेत. तिथे जादा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

'विरोधकांवर गंभीर आरोप करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'काल लाखो प्रवाशांना त्रास झाला. आंदोलनामुळे ८ ते ९ तास रेल्वे बंद होती. हे व्हायला नको होतं. ही देखील दुर्दैवी घटना आहे. अनेक लोकल खोळंबल्या. त्यात महिला आणि लहान मुले होती. ज्येष्ठ नागरिक होते, असे शिंदे म्हणाले.

'कालचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. गाड्या भरभरून आंदोलनकर्ते आले होते. मंत्र्यांनी मागण्या पूर्ण केल्या, तरी आंदोलक मागे हटायला तयार नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. त्यांनी ८ ते ९ तास रेलरोको करणे म्हणजे देशाचं नुकसान आहे. रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे. चिमुकलीवरून राजकारण करणे चुकीचं आहे. ज्यांनी राजकारण केलं,त्यांना लाज वाटली पाहिजे. गाड्या भरून लोक आंदोलनासाठी आले होते. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे', असे ते म्हणाले .

 बदलापुरात आंदोलन राजकीय प्रेरित, सरकारला बदनाम करण्याचा डाव; मुख्यमंत्री शिंदेंनी पुरावाच सांगितला
Badlapur Video: बदलापूर आंदोलनामुळे रेल्वे खोळंबल्या, प्रवाशांच्या मदतीला नागरिक धावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

'लेक लाडकी'चे बोर्ड घेऊन आले होते. 'लाडकी बहीण नको, सुरक्षित योजना हवी', असे बोर्ड दिसले. बहिणींना सुरक्षा द्यायची जबाबदारी आमची आहे. सरकारची आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाही. या प्रकणातील दोषींना सोडणार नाही. लाडकी योजनेमुळे विरोधकांना पोटदु:खी. पोटसुळ उठलं आहे. हे कालच्या आंदोलनातून दिसून आलं, असे शिंदेंनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com