Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

Giant beehive found on 31st floor building: मुंबईतील हाय-राइज इमारतीच्या 31व्या मजल्यावर मधमाशांनी मोठं पोळं बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होतेय.
Giant beehive found on 31st floor building
Giant beehive found on 31st floor buildingSAAM TV
Published On

मुंबईमधील एका हाय-राइज इमारतीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या इमारतीवरील 31व्या मजल्यावर मधमाशांनी मोठं पोळं बांधल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न समोर आलाय. संबंधित क्लिप्स एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या असून त्यामध्ये मधमाशांच्या पोळाचा आकार मोठा असल्याचं दाखवण्यात आलंय.

सोशल मीडियावर व्हायरल झाल व्हिडीओ

व्हिडीओमध्ये इमारतीच्या बाहेरील भागावर लटकलेलं मोठं मधमाशांचे पोळं दिसतंय. व्हिडीओ शूट करणाऱ्या महिलेचा आवाज यामध्ये ऐकू येत असून ती म्हणते की, या पोळ्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होतोय़. यामुळे घारत मधमाशा येत असून नागरिकांनाही त्रास होतोय.

Giant beehive found on 31st floor building
VIDEO: चिमुकल्याच्या कानात तीव्र वेदना, पालकही गोंधळले...; मशीनने तपासल्यावर डॉक्टरही झाले शॉक!

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वर पोस्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेअर देखील झाला. याबाबत अजून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये इमारतीभोवती बऱ्याच प्रमाणात मधमाशा उडताना दिसतात. शूटींग करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, पोळं काढण्यासाठी कारवाई तक्रारीनंतर करण्यात आली.

Giant beehive found on 31st floor building
Viral Video: लग्नात पडला चक्क पैशांचा पाऊस; पाहुण्यांचा उधळलेले पैसा उचलण्यासाठी गोंधळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून युझर्सने विविध कमेंट्सही केल्यात. यावेळी काही युजर्सनी रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोळं हटवणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. तर एका कमेंटमध्ये, उंच इमारतीत इतकं मोठं पोळं धोकादायक ठरू शकतं, असं म्हटलंय.

Giant beehive found on 31st floor building
Viral Video: माझा नवरा, तुझी बायको! पार्टनर समजून दुसऱ्याच महिलेला केलं Kiss; व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल

कीटक नियंत्रण तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांत थेट नाश करण्याऐवजी प्रशिक्षित टीमकडून सुरक्षित relocation करणं अधिक योग्य ठरतं. उंच इमारतींमध्ये पोळं आढळल्यास रहिवाशांनी स्वतः प्रयत्न न करता तज्ज्ञांची मदत घ्यावी, असंही ते सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com