Badlapur Saam
मुंबई/पुणे

Badlapur: एल्फिन्स्टनच्या पुनरावृत्तीची वाट पाहताय? मनसे नेत्याने दाखवलं बदलापूर रेल्वे स्टेशनचे भयाण वास्तव | VIDEO

Raju Patil Slams Railway Administration: बदलापूर स्थानकावरील चेंगराचेंगरीचा व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी केला शेअर, परळ-एल्फिन्स्टन दुर्घटनेची आठवण; मनसे नेते राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले.

Bhagyashree Kamble

Badlapur Railway Station: मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवास हा लाखो प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लाखो प्रवासी दररोज रेल्वे किंवा लोकलने प्रवास करतात. पण थोडेसेही नियोजन चुकल्यास काय भीषण परिणाम होऊ शकतो, याचे विदारक चित्र आपण परळ-एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत पाहिले होते. अशीच धोकादायक परिस्थिती सध्या बदलापूर स्थानकावर निर्माण झाली असल्याचं मनसे नेते राजू पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत निदर्शनास आणले. पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले.

राजू पाटील यांनी बदलापूर स्टेशनवरील प्रवाशांची चेंगराचेंगरी दाखवणारा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत रेल्वे प्रशासनाला थेट सवाल उपस्थित केला आहे, "तुम्ही कसली वाट पाहताय? @drmmumbaicr" असा सवाल त्यांनी कॅप्शनद्वारे उपस्थित केला आहे.

पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. या रेल्वे प्रशासनाचे थोडे जरी नियोजन चुकले तर काय परिस्थिती बिघडू शकते, त्याचं विदारक दृश्य परळ एल्फिन्स्टन पुलाच्या चेंगराचेंगरीत संपूर्ण मुंबईने पाहिलं. सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर देखील अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळते आहे," असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, "प्रवाशांचा विचार न करता प्लॅटफॉर्मवर अचानक लावलेले फेन्सिंग आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली उभारणी धोकादायक ठरत आहे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? पुन्हा एखाद्या परळ-एल्फिन्स्टनसारख्या दुर्घटनेची वाट बघताय का?" असा सवाल करत त्यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

Ahmedabad Student Death: आदल्या दिवशी १०वीच्या मुलीने 'सैयारा' पाहिला; दुसऱ्या दिवशी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

SCROLL FOR NEXT