Shocking: अपंग वडिलांसोबत स्टेशनवर, थोडक्यात ट्रेन सुटली; पहाटे पाणी आणायला गेली अन् नराधमांकडून सामुहिक बलात्कार

Father hospitalized daughter physical Assault at Railway Station: अपंग वडिलांना उपचारानंतर पुन्हा घरी घेऊन येत असताना एका तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना गोपालगंजमधील कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Rape
RapeSaam Tv
Published On

उत्तर प्रेदशातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. अपंग वडिलांना उपचारानंतर पुन्हा घरी घेऊन येत असताना एका तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना गोपालगंजमधील कुचायकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. एकाला अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

तरूणी आपल्या अपंग वडिलांना घेऊन श्यामपूरला पोहोचली. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर रविवारी घरी परतण्यासाठी रात्री सासामुसा स्टेशनवर पोहोचली. मात्र, ट्रेन सुटल्यामुळे तरूणी आपल्या वडिलांसोबत तिथेच राहिली. सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास तरूणी रेल्वे स्टेशनवरील हँडपंपावरून पाणी भरण्यासाठी गेली. मात्र, त्या ठिकणी अचानक ३ जणांनी तिची वाट अडवली. तसेच तरूणीचा गळा दाबला आणि जबरदस्तीने तिला एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Rape
Pakistan: 'मला गोळ्या घाला पण..' भारत सोडताना पाकिस्तानी लोकांना अश्रू अनावर; ६२७ जण मायदेशी परतले

सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर मुलगी जोरजोरात रडू लागली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्या निर्जनस्थळी धाव घेतली, तसेच तरूणीला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी तरूणीने दाखल केलेली तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एका आरोपीला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Rape
Mumbai: पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; ५-६ वाहनांची एकमेकांना धडक; अंधेरीजवळ वाहनांच्या रांगा

पोलिसांनी तातडीने पीडितेला उपचार आणि वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com