Raj Thackeray On Mumbai- Pune Expresssway Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: टोलचे पैसे परत द्या...., मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या ३२ तासांच्या वाहतूक कोंडींवरून राज ठाकरे संतापले

Raj Thackeray On Mumbai- Pune Expresssway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी तब्बल ३२ तासांनंतर सुटली. वाहतूक सुरळीत झाली आहे. पण या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला. या वाहतूक कोंडीवर भली मोठी पोस्ट करत राज ठाकरे संतापले आहेत.

Priya More

Summary -

• मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३२ तासांची वाहतूक कोंडी
• गॅस टँकर अपघातानंतर प्रवाशांचे मोठे हाल
• वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे यांची सरकारवर जळजळीत टीका
• प्रवाशांना टोल परत देण्याची मागणी त्यांनी केली

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता आडोशी बोगद्याजवळ गँस टँकर पलटी होऊन अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक तब्बल ३२ तास ठप्प झाला होता. आता टँकर बाजूला हटवण्यात आला असून वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. पण ३२ तासांच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या गंभीर विषयावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी 'रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का?', असा सवाल उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीवर जळजळीत पोस्ट करत सरकारला घाम फुटेल असे सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.'

राज ठाकरे यांनी एक्स्प्रेस वेवर सुरू असलेल्या टोलवसुलीवरून देखील सरकारला धारेवर धरले.'मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.'

रस्ता बांधून टोलवसुली करणं इतकंच सरकारची जबाबदारी आहे का? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का?'

राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.'

तसंच, 'ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.', असे म्हणत राज ठाकरे यांनी वसूल केलेला टोल परत प्रवाशांना द्या असे सरकारला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Superfoods For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

NCERT Recruitment: कोणत्याही परीक्षेशविाय मिळणार NCERT मध्ये नोकरी; पगार १.४४ लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Health Care : ग्लोइंग स्कीनसाठी प्या पपई स्मूदी; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT