

मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार
मिसिंग लिंकचे काम ९४ टक्के पूर्ण
या दिवशी सुरु होणार मिसिंग लिंक
मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. मिसिंग लिंक १ एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्यामुळे तुमचा मुंबई-पुणे प्रवास खूप सुसाट होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मिसिंग लिंकचं काम सुरु होतं. मात्र, आता हे काम पूर्ण झालं आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरु झाल्यानंतर २४ वर्षांनी आता मिसिंग लिंक सुरु होणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले होते. परंतु आता हा मिसिंग लिंक सुरु झाल्यानंतर तुमचा २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. याचसोबत ६ किमीचा प्रवास कमी होण्याची अपेक्षा आहे.
सध्या या प्रवासासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा वापर करावा लागतो. आता थेट मिसिंग लिंकमुळे तुमचे ६ किमीचे अंतर वाचणार आहे. हा एक पुल आहे. हा पुल थेट एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते मंडळाने या प्रकल्पाचे काम केले आहे. या प्रकल्पाचा खर्च ६,६९५.३७ कोटी रुपये आला आहे. यामध्ये खालापूर लोणावला दरम्यानचे बोगदे आणि केबल स्टेड पूलाचे काम सुरु आहे. हा भाग मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील सर्वात गर्दीचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. मात्र, मिसिंग लिंकमुळे तुमचा वेळ वाचणार आहे.
कधीपर्यंत सुरु होणार मिसिंग लिंक? (Mumbai Pune Expressway Missing Link Start Date)
एमएसआरडीसी अधिकाऱ्यांच्या मते, मिसिंग लिंकमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे केबल स्टेड पुलाचे दोन्ही टोक जोडणे. आता पुढच्या महिन्यात हे दोन्ही टोक जोडले जाणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे आणि हवामानामुळे मिसिंग लिंकच्या कामाची अंतिम मुदत जानेवारी २०२६ वरुन एप्रिल २०२६ करण्यात आली आहे. हा प्रकल्प १ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मिसिंग लिंकचा उद्देश
मिसिंग लिंकचा मुख्य उद्देश खालापूर आणि लोणावळा दरम्यान वाहतुकीचा ताण कमी करणे आहे. सुट्टीच्या दिवशी या भागात खूप गर्दी असते. त्यामुळे खालापूर टोल प्लाझा ते खोपोली एक्झिट दरम्यानचा ५.८६ किमी लांबीच्या मार्गावर सध्याचा एक्सप्रेसवेळ आठ लेनपर्यंत रुंद करण्यात आला आहे.
मिसिंग लिंकचे काम प्रगतिपथावर
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोगद्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्यांची इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल चाचणी सुरु आहे. एका पुलाचे काम पूर्ण झाले की दुसऱ्या पुलाचे काम पूर्ण होईल.गर्डर आणि डेक स्लॅबचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. खालापूर ते खोपोली दरम्यान एक्सप्रेस वेचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच तळेगाव टोल प्लाझावरील विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. खालापूर टोल नाक्याजवळील काम प्रगतिपथावर आहे. या सर्वाचा विचार करता, मिसिंग लिंकचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.