Khalapur Toll Plaza : बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई; खालापूर टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड

Raigad News : टोलनाक्यावर व्हीआयपींना टोल माफ आहे. या अनुषन्गाने व्हीआयपी पास विक्री करण्याचे काम केले. अनेकांना पास विक्री करून लाखो रुपये कमविल्याचे समोर आले असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल
Khalapur Toll Plaza
Khalapur Toll PlazaSaam tv
Published On

सचिन कदम

रायगड : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या तरुणाने बनावट व्हीआयपी पास तयार करून विकले. यातून लाखो रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ओंकार महाडिक असे फसवणुक करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने हा गोरखधंदा केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान टोलनाक्यावर व्हीआयपींना टोल माफ आहे. यातूनच व्हीआयपी पास तयार करून त्या विक्री करण्याचे काम ओंकार याने केले आहे. यातून त्याने अनेकांना पास विक्री करून पैसे कमविले.   

Khalapur Toll Plaza
Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

व्हीआयपी पास धारकांच्या संख्येत अचानक वाढ 

दरम्यान टोलनाक्या वरून मोफत व्हीआयपी पासवरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. याचा येथील अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता काही वाहन चालकांकडील पास बनावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी टोल नाका प्रशासनाने याचा तपास केला असता यात ओंकार महाडिक याचं नाव समोर आले असता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापुर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Khalapur Toll Plaza
"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

अकोल्यात अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्या
अकोला शहरात अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्या आहेत. अकोल्यातल्या राजू गांधी नगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्रीच्या सुमारास या दुचाकींना पेटवून देत जाळण्यात आल्या. मात्र दुचाकी कुणी आणि का जाळल्या? हे कळू शकले नाही. या प्रकरणात सिव्हिल पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मध्यरात्रीच्यानंतर घराबाहेर ठेवलेल्या तीनही दुचाकिंमवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा हा प्रकार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com