Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: राज ठाकरेंबाबात वादग्रस्त पोस्ट, पुण्यात मनसैनिक आक्रमक; पाहा VIDEO

Pune MNS: पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केदार सोमण यांच्या घराबाहेर मनसैनिकांनी राडा करत जोरदार घोषणाबाजी केली.

Priya More

राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण यांच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत राडा घातला. राज ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमण यांना मनसे कार्यकर्ते चोप देण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला. मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली मनसे कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. कोथरूड येथील राहणारा केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

केदार सोमण यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सुमन यांचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर मनसैनिकांनी आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली. सुमन यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिस कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोहचले. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते याठिकाणी आले होते.

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य द्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र केदार सोमाण यांना घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा गोंधळ घातला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT