Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला ५५०० रुपयांचे फक्त व्याजदर मिळते.
Post Office Scheme
Post Office Schemesaam tv
Published On

प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी फार आधीपासूनच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात पैसे असतात. जर तुम्हीही आतापासून गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा मिळतो. दर महिन्याला पैसे मिळतात.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. दर महिन्याला पैसे मिळतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण भासणार नाही. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमबद्दल माहिती देणार आहोत.(Post Office Monthly Income Scheme)

Post Office Scheme
Scheme: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् लखपती व्हा; पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम करेल मालामाल

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणत्याही वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतात. या योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. या योजनेत गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला १००० रुपये गुंतवून अकाउंट ओपन करु शकतात.

योजनेसाठी पात्रता

१८ वयापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती

जॉइंट अकाउंट उघडू शकता.

या योजनेत १००० रुपयांची गुंतवणूक करुन अकाउंट ओपन करु शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. या योजनेत मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर १ वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यावर रिटायरमेंटनंतर महिन्याला काही रक्कम मिळते.या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात.

या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकतात.अकाउंट उघडल्यानंतर एक महिन्यानंतर मॅच्युरिटीनंतर व्याज मिळते.

महिन्याला ५५०० रुपयांचे व्याज

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त व्याजातून ५५०० रुपयांची कमाई करु शकतात. या योजनेत जर तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख रुपये जमा केले. तर त्यावर ७.४ टक्के व्याजदरानुसार दर महिन्याला ५५०० रुपये व्याज मिळार आहे. जर तुम्ही जॉइंट अकाउंट ओपन केले तर १५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दर महिन्याला ९,२५० रुपये व्याजदर मिळते.

Post Office Scheme
Pink E-Rikshaw Scheme: पिंक ई रिक्षा योजना आहे तरी काय? किती अनुदान मिळणार? वाचा सविस्तर

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर व्याजदर घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी अकाउंट ओपनिंग फॉर्म, केवायसी आणि पॅन कार्डची गरज भासणार आहे.

Post Office Scheme
Crop Insurance Scheme: फळपिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; राज्य सरकारचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com