Maharashtra Politics: मनसे न आल्यास ठाकरे सेनेचं एकला चलो? ठाकरेंचा प्लॅन बी; डिनर डिप्लोमसीत काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी प्लॅन B ची तयारी सुरु केलीय. उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी काय आहे? यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
uddhav Thackeray
Maharashtra Politics
Published On

ठाकरे बंधू एकत्र कधी येणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. कारण दोन्ही ठाकरे केवळ जाहीर सभांमधून साद प्रतिसाद देत आहेत. प्रत्यक्षात कुणीही कुणाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांची बैठक घेतलीय. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना महत्त्वाचे आदेश दिलेत. ज्यामुळे उद्धव ठाकरे युतीबाबत प्लान B आखत असल्याची चर्चा रंगलीय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी तर नियोजन अंतिम टप्प्यात पोहचल्याचं सांगितलं.

मुंबईतल्या ताज लँड्समध्ये ठाकरे सेनेची डिनर डिप्लोमसी रंगली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदार- खासदारांनी प्लॅन बी संदर्भात कोणते आदेश दिलेत. पाहूयात.

युतीबाबत संभ्रम, ठाकरेंचा प्लॅन बी

मनसेसोबत युतीबाबत स्थानिक वातावरणाची चाचपणी करा

युतीच्या भरवशावर न राहता स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा

मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा

ग्राऊंड लेव्हलवर पक्षसंघटना मजबूत करा

तर दुसरीकडे ठाकरे सेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये खटके उडालेत. संदीप देशपांडे यांनी युतीबाबत शिवसेनवर टीका केलीय. तर राऊतांनीही कोण काय बोलतयं त्यावर भूमिका ठरणार नाही, असा टोला देशपांडेंना लगावलाय.

राज ठाकरेंवर बिसंबून न राहता उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याचा प्लॅन बी तयार केल्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार? असा सवाल निर्माण झालाय. त्यामुळे युतीच्या चर्चांना हळुहळु फुलस्टॉप लागणार की ऐनवेळी ठाकरे बंधू एकत्र येऊन मनपा निवडणुकीपूर्वी सर्वांनाच धक्का देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com