Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी मिरारोडमधील सभेतून निशिकांत दुबे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. 'दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये...मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे,असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान दिलं आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. मराठी माणसाला आम्ही पोसतोय? अशी दर्पोक्तिही दुबे यांनी केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना थेट चॅलेंज दिलं आहे. राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना मुंबईत येण्याचं आव्हान केलं. दुबे तू मुंबईत येऊन दाखव? मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबेंवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यांवरून भाजपवर अप्रत्यक्ष टोला लगावला. राज ठाकरे म्हणाले, 'माझं सर्व भाषांवर प्रेम असून राज्यातील सर्व नेत्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. जगाताली कोणतीही भाषा वाईट नसते. तशीच हिंदी देखील काही वाईट नाही. पण आमच्यावर हिंदी भाषा लादणार असेल तर स्वीकरणारच नाही. हिंदुत्वाच्या बुरख्याखालून मराठी संपवणार असेल तर माझ्यासारखा कडवट मराठी माणूस भेटणार नाही. आपण हिंदू आहोत, हिंदी नाही'.
राज ठाकरे म्हणाले, 'हिंदी सक्ती करून अमराठी मतदारसंघ तयार करायचे आहेत. मुंबई शहर गुजरातला जोडण्यासाठी खटाटोप आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. हिंदी भाषिकांना हा माज येतो कुठून? आधी जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता लपूनछपून सांगितले जात आहे. षडयंत्र समजून घ्या, हे सहज आलेला माज नाही. मराठी बांधवानो सतर्क व्हा'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.