Raj Thackeray gets major relief as Thane Sessions Court acquits him in the 2008 railway recruitment protest case after 18 years. Saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, १८ वर्षे जुन्या प्रकरणात दिलासा, वाचा कोर्टानं नेमकं काय सांगितलं?

Big Relief for Raj Thackeray as Court Clears Him in 2008 Protest Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत निर्दोष मुक्त केले.

Omkar Sonawane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने आज एक मोठा दिलासा दिला आहे. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून राज ठाकरेंना निर्दोष मुक्त केले आहे. आंदोलनादरम्यान कथित चिथावणी दिल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर होता. मात्र, सरकारी पक्षाला त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट करणारे आणि गुन्हा सिद्ध होईल असे कोणतेही ठोस पुरावे न्यायालयात सादर करता आले नाहीत. पुराव्याअभावी न्यायालयाने राज ठाकरे यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. हा मनसे प्रमुखांसाठी कायदेशीर आघाडीवर खूप मोठा विजय मानला जात आहे.

२००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेवेळी झालेल्या आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांनी कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाने न्यायालयात पुरावे सादर केले. मात्र आरोपींचा थेट सहभाग आणि गुन्हा सिद्ध होईल असे ठोस पुरावे मांडण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, पुराव्यांच्या अभावामुळे राज ठाकरे यांना दोषी ठरविणे शक्य नसल्याचे नमूद करत त्यांची निर्दोष मुक्तता जाहीर केली. त्यामुळे तब्बल १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा शेवट झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण 2008 चे असून ऑल इंडिया रेल्वे भरती परीक्षेसाठी महाराष्ट्रात कल्याण परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. या खटल्यात राज ठाकरे हे आरोपी क्रमांक 10 आहेत. राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत भडकाऊ भाषण केल्याचा आरोप फिर्यादी पक्षाने ठेवला होता.

त्यांच्या या चिथावणीखोर भाषणामुळे (MNS) मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले, असा पोलिसांचा आरोप होता. या प्रकरणात एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल होता, मात्र यामध्ये 2 आरोपींचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT