Agriculture : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान! कमी पाण्यात भरघोस उत्पन्न देऊ शकणारी ७ पिके

Shreya Maskar

कमी पाण्यात येणारी पिके

पावसाचे प्रमाण कमी असणे, विहिरींची खालावलेली पाणीपातळी आणि सिंचनासाठी पाण्याची कमतरता यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर रब्बी हंगामात मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत कमी पाण्यात तग धरू शकणारी आणि तुलनेने कमी सिंचनात येणारी पिके निवडणे फायदेशीर ठरू शकते.

Crops That Grow with Less Water | pinterest

हरभरा

रब्बी हंगामातील हरभरा हे कमी पाण्यात घेता येणारे महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास आणि गरजेच्या वेळी संरक्षित पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.

Chickpea | pinterest

रब्बी ज्वारी

कमी पावसाच्या भागात रब्बी ज्वारीची लागवड फायदेशीर ठरू शकते. या पिकापासून धान्याबरोबरच जनावरांसाठी चारा आणि कडबा मिळतो.

Rabi Sorghum | pinterest

करडई

करडई हे तुलनेने दुष्काळ सहन करणारे तेलबिया पीक आहे. कमी पावसाच्या आणि मर्यादित सिंचनाच्या भागात योग्य जमिनीत याची लागवड करता येते.

Agriculture | pinterest

सूर्यफूल

सूर्यफूल हे तेलबियांचे महत्त्वाचे पीक असून कमी पाण्याच्या परिस्थितीतही योग्य नियोजनाने घेता येते. फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची उपलब्धता महत्त्वाची असते.

Sunflower | pinterest

मोहरी

मोहरी हे हिवाळ्यात घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. तुलनेने कमी सिंचनात याची लागवड करता येते. योग्य हवामान आणि जमिनीचा प्रकार असल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्याय मिळू शकतो.

Mustard | pinterest

मसूर

मसूर हे कमी कालावधीत तयार होणारे कडधान्य पीक आहे. जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करून मर्यादित पाण्यात याची लागवड करता येते.

Masoor | pinterest

जवस

जवस हे तेलबिया पीक असून रब्बी हंगामात घेतले जाते. कमी पाण्याच्या परिस्थितीत योग्य वाण आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन याची लागवड करता येते.

Flax | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कृषीतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Note | pinterest

NEXT : चहाप्रेमींसाठी खास रेसिपी! हॉटेलसारखा तंदुरी चहा आता घरातच, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Tandoori Chai Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...