Railway Ticket Rule Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Ticket Rule: दिवाळीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय! या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट बंद; वाचा सविस्तर

IRCTC Railway Platform Ticket Rule: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. आता काही रेल्वे स्थानकावर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाहीये. गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhi Hande

रेल्वेचा मोठा निर्णय

काही रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीसाठी हजारो लोक आपापल्या घरी, गावी जातात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा खूप जलद आणि आरामदायी असतो. दरम्यान, या काळात रेल्वे स्टेशनवर खूप जास्त गर्दी होते. रेल्वे स्थानकावर पाय ठेवायलाही जागा नसते.त्यामुळे रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतीलही अनेक रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाहीये.

रेल्वेने आता नवी जिल्ली, हजरत निजामुद्दीन, आनंद विहार टर्मिनल आणि गाजियाबाद या रेल्वे स्थावकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद असणार आहे. दिवाळीत होणाऱ्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते. प्रवाशांची संख्या आणि त्यांना सोडवायला येणाऱ्या नातेवाईकांचीही संख्या जास्त असते. त्यामुळे कोणतीही आप्तकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त रेल्वे तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर जाता येणार आहे.

दरम्यान, रेल्वेतील काही श्रेणींसाठी सूट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, अशिक्षित व्यक्ती किंवा महिलांसोबत आलेल्या इतर व्यक्तींना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदीसाठी परवानगी आहे. मात्र, तिकीट काउंटवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तुम्हाला त्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत. त्यानंतरच तुम्हाला तिकीट दिले जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.

मुंबईतील या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट बंदी

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेनेही अनेक स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटवर बंदी घातली आहे. १५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई वांद्रा टर्मिनस, वापी, उधना, सुरत या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट विकली जाणार आहे. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल, ठाणे, कल्याण आणि पनवेल येथे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडले, विरोधी पक्षनेताच नाही

Shocking : ठाणे हादरलं! कोर्टाजवळ कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

SCROLL FOR NEXT