Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कन्फर्म तिकाटाची तारीख बदता येणार आहे. हा नियम कधीपासून लागून होणार हे वाचा सविस्तर...
Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?
Railway Online ticket reservationsaam tv
Published On

Summary -

  • रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • आता कन्फर्म तिकीटाची तारीख बदलता येणार

  • हा नवा नियम जानेवारी २०२६ पासून लागू होणार

  • ऑनलाईन पद्धतीने तारीख बदलता येणार आहे

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. प्रवाशांना कन्फर्म तिकीटाची तारीख बदलण्यासाठी ते कॅन्सल करावे लागणार नाही. या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. यापुढे प्रवाशांसी कन्फर्म तिकीटाची तारीख देखील बदलू शकतील. त्यासाठी त्यांनी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. जानेवारी २०२६ पासून रेल्वेचा हा नवा नियम लागू होणार आहे. यापुढे प्रवासी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कन्फर्म तिकीटावरील तारीख बदलू शकतील.

भारतामधील नागरिक रेल्वे प्रवासाला जास्त पसंती देतात. त्यामुळे भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नेहमी बदल केले जातात. आता रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास नियम आणला आहे. यापुढे तुम्ही कन्फर्म तिकीटावरील तारीख बदलू शकता. यापूर्वी जर तुम्हाला तुमची प्रवासाची तारीख बदलायची असेल तर तुम्हाला तिकीट रद्द करावे लागत होते आणि नवीन तिकीट बुक करावे लागत होते. यामुळे पैसे कट व्हायचे आणि अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. पण आता हा त्रास संपणार आहे. नवीन रेल्वे नियमानुसार आता तिकिट रद्द करता येणार नाहीत. तर फक्त तारीख बदलता येईल.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?
Indian Railway: भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात

तुम्ही कन्फर्म तिकीटावरील तारीख बदलेल्यानंतर नवीन तारखेला तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही हे सीट उपलब्धतेवर अवलंबून असेल. जर नवीन तारखेला भाडे जास्त असेल तर प्रवाशांना फक्त तेच भाडे द्यावे लागेल. तारीख बदलण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?
Maharashtra New Railway Line: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

दरवर्षी लाखो प्रवासी शेवटच्या क्षणी त्यांचे प्रवासाचे नियोजन बदलतात. अशा परिस्थितीत तिकिटे रद्द केल्याने प्रवाशांना फक्त आर्थिक नुकसान होत नाही तर नवीन तिकीटही मिळण्याची शक्यता कमी असते. रेल्वेच्या या नवीन निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमांनुसार जर ट्रेन सुटण्याच्या ४८ ते १२ तास आधी कन्फर्म तिकीट रद्द केले तर भाडे २५ टक्क्यांनी कमी होते. जर ट्रेन सुटण्याच्या १२ ते ४ तास आधी तिकीट रद्द केले तर भाडे वाढते. आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर रद्द केल्यास पैसे परत मिळत नाहीत.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?
Railway Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com