Akola : 'त्या' २ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मिळणार आर्थिक मदत; कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

Akola News : १७ सप्टेंबरला उमरा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्र नुकसान झाले. तसेच गेल्या 2 वर्षापासून असलेल्या स्कायमेट वेदर स्टेशनचा चुकीचा अहवाल जात असल्याने या 2000 शेतकऱ्यांना फटका
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

अक्षय गवळी 
अकोला
: अकोल्यात 'स्कायमेट वेदर स्टेशन'चा चुकीच्या अहवालामुळे २ हजारांवर शेतकऱ्यांना फटका बसला होता. या संदर्भात बातमी साम टीव्हीने दाखवली होती. त्यानंतर आज कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी मुंबईत बैठक बोलावत नुकसान झालेल्या त्या दोन हजार शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत लाभ मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

मुंबईत आज उमरा मंडळ संत्रा विमा परताव्याबाबत बैठक पार पडली. उमरा मंडळातील शेतकऱ्यांना संत्रा विमा परतावा मिळावा; यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आमदार अमोल मिटकरी यांची देखील उपस्थिती होती. तर या बैठकीस कृषी विभागाचे सचिव तसेच अप्पर सचिव उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

Akola News
Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

या कारणामुळ शेतकऱ्यांवर ओढवलं होत संकट
उमरा मंडळात स्कायमेट कंपनीने वेदर स्टेशन अर्थात पाणी मापक यंत्र चुकीच्या ठिकाणी बसविले होते. यामुळे अतिवृष्टी आणि पावसाची नोंद घेण्यास असमर्थ ठरलं होत. हे पाणी मापक यंत्र नाल्यात बसवल्याने मोठा गोंधळ झाला आणि २ हजारपेक्षा अधिक शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहिले होते. दरम्यान, १७ सप्टेंबरला उमरा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सर्वत्र नुकसान झाले. तसेच गेल्या 2 वर्षापासून असलेल्या स्कायमेट वेदर स्टेशनचा चुकीचा अहवाल जात असल्याने या 2000 शेतकऱ्यांना फटका बसला होता.

Akola News
Arvind Sawant : राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा उबाठाचा निर्णय पक्का; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर अरविंद सावंत यांचे वक्तव्य

कृषी मंत्री भरणे यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून पुढील टप्प्यात पुन्हा बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा नक्की मिळेल असे आश्वासनही त्यांनी दिले. या संपूर्ण विषयात आमदार अमोल मिटकरी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अकोला जिल्ह्यातून सात ते आठ शेतकरी गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com