Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

Nagpur News : केंद्राच्या पथकाने छिंदवाडा जिल्ह्यातील परासीया तालुक्यात जाऊन पाहणी केली. कफ सिरपमुळे सर्वाधिक मुले परासीया तालुक्यातील प्रभावित आहे. तर केंद्रीय पथक तीन दिवसांत अहवाल सादर करण्याची शक्यता
Cough Syrup
Cough SyrupSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक तपासणीत १३ रुग्णाचा सबंध आणि हिस्ट्री मध्ये कफ सायरफ असल्याचे समोर आले असून मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

नागपूर महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सुरवातीला उपचारासाठी आलेल्या केसेसवर ऍक्युट इन्सफलाईटीस सिंड्रोम म्हणजेच 'मेंदूज्वर' म्हणून उपचार करण्यात आले आहेत. मात्र नंतर हा मेंदूज्वर नसून विषबाधेचा प्रकार असल्याचे तपासणीत समोर आले. खासकरून मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज येणे आणि नंतर रुग्ण कोमामध्ये जात मृत्यू होणे असे लक्षण दिसून आले.

Cough Syrup
Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

मृतांमध्ये छिंदवाडा जिल्ह्यातील मुलांची संख्या अधिक 

कफ सिरपमुळे आतापर्यंत नागपुरात विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले एकूण १३ मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत लहान मुले हि मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि सिवनी जिल्ह्यातील आहेत. नागपुरात उपचारासाठी आतापर्यंत एकूण ३६ रुग्ण दाखल झाले होते. यापैकी छिंदवाडा जिल्ह्यातील १२ आणि सिवनी जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे. नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात या मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Cough Syrup
Nandurbar : जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळेना; विद्यार्थी पोहोचले थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

प्रशासन खडबडून जागे 

कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे जागे झाले आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या (DMER) पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच DMER च्या चमूमध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. आरती किनीकर, जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. छाया वळवी, जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांचा समावेश आहे. यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली. 

सॅम्पल केले सील 

संशयित मेंदूज्वरच्या काही केसेस दरवर्षी आढळत असतात. नंतर लघवी थांबणे असे प्रकार समोर आले आहेत. मात्र छिंदवाडा येथून महिती मागावली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून चौकशी सुरू केली. NIV च्या टीमने तपासणी केली असता चांदीपुरा, स्क्रब टायफस, यासहस अन्य टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र छिंदवाडा येथून आलेले रुग्णामध्ये कोल्डद्रीफ औषध मिळून आले. यात सॅम्पल सील करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com