ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारतीय रेल्वेची गणना केली जाते.
तुम्ही भारतीय रेल्वे आणि वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक गोष्टी ऐकली असतील. भारतीय रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत.
आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात अनोख्या आणि एकमेव रेल्वे स्टेशनबद्दल सांगणार आहोत जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात गाड्या सहज उपलब्ध आहेत.
भारतातील हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे येथून देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेसह सर्व दिशांना गाड्या जातात.
या रेल्वे स्टेशनचे नाव मथुरा आहे. येथून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.
हे भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशनपैकी एक आहे, जिथे दररोज सुमारे १९७ गाड्या थांबतात.
भारतातील या स्टेशनची खासियत म्हणजे दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई मार्गावरील एक महत्त्वाचे स्टेशन आहे.