India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीची सुट्टी

दिवाळीची सुट्टी लागलीये आणि एक झटपट ट्रिपसाठी एकदम परफेक्ट वेळ मिळाला आहे. जर तुम्हीही ट्रीपची प्लानिंग करणार असाल तर आम्ही तुम्हाला काही ऑप्शन सांगणार आहोत.

बजेट फ्रेंडली

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुम्ही फक्त ₹20,000 च्या बजेटमध्ये पाहू शकता. तुम्हाला वारसा संस्कृती हवी असेल, बीच हवा असेल किंवा डोंगरातील शांतता हवी असेल, या ठिकाणी सगळं काही मिळतं

पुष्कर, राजस्थान

दिवाळीत पुष्करचे वातावरण खूप छान असतं. तलावाच्या घाटांवर दिव्यांची रोषणाई, मंदिरे उजळलेली आणि रंगीबेरंगी बाजार गजबजलेले असतात. यामध्ये २–३ दिवसांचा प्रति व्यक्ती एकूण खर्च = ₹8,000 – ₹12,000.

ऋषिकेश, उत्तराखंड

जर तुम्हाला दिवाळी फटाक्यांपेक्षा शांततेत आणि अध्यात्मात घालवायची असेल तर ऋषिकेश परफेक्ट ठिकाण आहे. इथे गंगेच्या घाटावर संध्याकाळचे शांत क्षण, डोंगरांमध्ये योग आणि भजनांची ध्वनी ही एक थेरपीसारखी वाटते. साधारण ₹10,000 – ₹15,000 खर्च येतो

जयपूर, राजस्थान

दिवाळीत राजस्थान रोषणाईच्या प्रकाशात न्हाऊन निघतं. किल्ले, राजवाडे आणि बाजारपेठा उजळतात आणि शहरात सणासुदीचे सुंदर वातावरण तयार होते. ट्रीपचा खर्च ₹18,000 च्या आत आरामात होऊ शकते.

वाराणसी, उत्तर प्रदेश

दिवाळीसारखे दिवाळी वाराणसीत कोणी साजरी करत नाही. घाटांवर तरंगणारे दिवे, मंदिरांतून घुमणारी मंत्रोच्चारे आणि शहराची प्राचीन आध्यात्मिक ओळख हे सगळं अनुभवताना प्रत्येक कोपरा पवित्र वाटतो. ₹18,000 मध्ये ट्रिप करता येते.

कूर्ग, कर्नाटक

जर तुम्हाला गर्दी आणि फटाक्यांपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात दिवाळी साजरी करायची असेल, तर कूर्गची हिरवी टेकड्या, कॉफी प्लँटेशन्स आणि धुक्याच्या सकाळी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. २–३ दिवसांची ट्रिप केल्यास ₹10,000 – ₹18,000 मध्ये करता येते.

मैसूर, कर्नाटक

मैसूर दिवाळीत राजेशाही रूप धारण करतो. मैसूर पॅलेस रोषणाईने उजळतो, भव्य मिरवणुका नजरेत साठवाव्या अशा असतात आणि रेशमी साड्यांचे बाजार शहराला अधिकच सणासुदीचे बनवतात. ३ दिवसांची दिवाळी ट्रिप ₹15,000 – ₹18,000 मध्ये सहज करता येते.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा