MUMBAI-AHMEDABAD BULLET TRAIN PROJECT 80% COMPLETE, FIRST PHASE TO START IN 2027 Saam Tv
मुंबई/पुणे

Vande Bharat : मुंबई अहमदाबाद प्रवास फक्त १ तासात, २०२७ ला सुरु होणार पहिला टप्पा; जाणून घ्या A to Z माहिती

Vande Bharat News : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून सुरत-बिलिमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे ८० टक्के बांधकाम पूर्ण

  • सुरत-बिलिमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार

  • बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किमी

  • मुंबई-अहमदाबाद प्रवास १ तास ५८मिनिटांत पूर्ण होणार

देशातील बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचे सुमारे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, या प्रकल्पाचा पहिला कार्यान्वित होणारा टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाला आहे.

गुजरातमधील सानंद येथे सीजी सेमीच्या ओसॅट प्रकल्पात व्यावसायिक उत्पादनाच्या कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरत ते बिलिमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वापी-सुरत, वापी-अहमदाबाद, अहमदाबाद-ठाणे आणि अखेरीस अहमदाबाद-मुंबई हा संपूर्ण मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग आहे. हा प्रकल्प जपानच्या अत्याधुनिक शिंकान्सेन तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केला जात आहे. सुमारे ५०८ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण १२ स्थानके असतील. या प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊन तो अवघ्या १ तास ५८ मिनिटांपर्यंत येणार आहे. या बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. विशेष म्हणजे, या प्रकल्पात भारतात प्रथमच जे-स्लॅब बॅलस्टलेस ट्रॅक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

याशिवाय २० हजारांहून अधिक ओव्हरहेड खांब, १२ ट्रॅक्शन सबस्टेशन्स आणि आधुनिक वीज वितरण व्यवस्था उभारली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशभरात आणखी ७ हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याची योजना आखली आहे. सुमारे ४,००० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांसाठी अंदाजे १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मुंबई-पुणे, चेन्नई-बंगळूर, पुणे-हैदराबाद, दिल्ली-वाराणसी यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे देशातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होण्यास मोठी मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : रात्री एकत्र जेवले, सकाळी मृतदेहच भेटला; प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या पत्नीनं घेतला जीव

Paach Futaacha Bachchan: वारकरी परंपरेची अनोखी कथा मोठ्या पडद्यावर; 'पाच फुटाचा बच्चन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra News Live Update: निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग

पावसाळ्यात मिळणारी कुड्याच्या फुलांची रानभाजी कशी बनवायची?

NEET मध्ये फक्त 11 गुणांनी हुकली सीट; अहिल्यानगरमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT