shrikant shinde Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai local crowd : रेल्वे प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार? खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

shrikant shinde on Mumbai local crowd : रेल्वे प्रवाशांची गर्दीतून सुटका होण्याची शक्यता खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. प्रवासी लवकरच गर्दीमुक्त ट्रेनने प्रवास करतील, अशी शक्यता खासदार शिंदेंनी व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

लोकल गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय

पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाल्याने अतिरिक्त लोकल सेवा शक्य असल्याचा दावा खासदार शिंदेंचा दावा

तिसरी आणि चौथी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर गाड्यांची संख्या वाढणार असल्याचही त्यांनी म्हटलंय

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

लोकल गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकलच्या गर्दीत प्रवाशांना स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभे राहण्यासाठी जागा नसते. याच गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांच्या मृत्यूच्या घटन घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लोकलमधून पडून एका बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकल गर्दीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी वाढली होती. त्यानंतर लोकल प्रवाशांना दिलासा देणारी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

वाढत्या रेल्वे गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना यावर ठोस उपाययोजना सुरू असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि त्यांना गती देण्यासाठी केंद्र व रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी खासदार शिंदेंनी स्पष्ट केले.

पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने कल्याण परिसराला अतिरिक्त लोकल सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच कल्याणच्या पुढील तिसरी आणि चौथ्या मार्गिकेचे काम सध्या सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर आणखी गाड्या वाढवता येतील, असे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पही या मतदारसंघातून जात आहे. तो पूर्ण झाल्यानंतर मालगाड्या मुख्य लाईनवरून कमी होतील आणि त्यामुळे प्रवासी गाड्यांसाठी अधिक मार्ग उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय मेट्रो प्रकल्प, रिंग रोड, बायपास रस्ते आणि समांतर मार्ग यांसारख्या पर्यायी वाहतूक सुविधा विकसित करण्याचे कामही वेगात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत पहिला मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढला

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT