Railway Employee
Railway Employee Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Employee: मध्य रेल्वेचे 50 पेक्षा जास्त अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे कामकाज

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या काही दिवसात कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. आता कोरोनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेतही शिरकाव केला आहे. मध्य रेल्वेमध्ये 31 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पश्चिम आणि मध्य रेल्वेमधील सरासरी 800 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे (Railway Employee of central and western railway infected by corona).  

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा कामासाठी मेगाब्लॉक (megablock) घेतला होता. यावेळी मध्य रेल्वे (Central Railway) चे कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जास्त संपर्क आला होता. त्यामुळे हा मेगाब्लॉक कोरोना हॉटस्पॉट (Corona Hotspot) तर ठरला नाही ना अशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

एक हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना (Corona) चा तिसऱ्या लाटेत मध्य रेल्वेच्या 50 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण करुन 10 अधिकारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. तर 40 कर्मचारी घरी किंवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर मध्य रेल्वेच्या 500 हुन आणि पश्चिम रेल्वेच्या 500 हुन अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.

वर्कशॉपमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये 578 जणांची चाचणी केली. त्यापैकी 194 कोरोना पॉझिटीव्ह मिळाले आहेत. लोअर परळ वर्कशॉपमध्ये 514 जणांची चाचणी केली असता 145 कोरोना पॉझिटीव्ह मिळाले आहेत. याशिवाय लोअर परळ डिस्पेसरीमधील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वे ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या कामासाठी कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जास्त संपर्क आला होता. त्यामुळे हा मेगाब्लॉक कोरोना हॉटस्पॉट तर ठरला नाही ना अशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT