India Corona Update: कोरोनाची गंती मंदावली, 24 तासात 2,58,089 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2,58,089 नवीन रुग्ण आढळले आहेत.
India Corona Update
India Corona UpdateSaam TV

India Corona Update: नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2,58,089 नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारी आलेल्या आकडेवारीपेक्षा हा आकडा 13,113 ने कमी आहे. रविवारी कोरोना विषाणूचे 2,71,202 रुग्ण आढळले होते (Latest News on India Corona Update: Cases register 258089 new cases in last 24 hours).

India Corona Update
Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा उद्रेक; 41 हजार 327 नव्या रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 1,51,740 लोकांनी या धोकादायक आजारावर मात केली आहे. तर 385 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4,86,451 झाली आहे. कोरोना (Corona) च्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराची आता भारतात 8,209 प्रकरणे वाढली आहेत.

157 कोटी लोकांचं लसीकरण

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. Omicron च्या एकूण रुग्णांची संख्या 8,209 वर पोहोचली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत त्यात 6.02 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 3,52,37,461 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

कोरोनाविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण लसीकरणाचा आकडा 1,57,20,41,825 वर पोहोचला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, रविवारी भारतात कोरोना (Corona) च्या 13,13,444 नमुना चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 70,37,62,282 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात 41,327 नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासात 41,327 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 72,11,810 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 40,386 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 68,00,900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,808 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,65,346 रुग्ण अॅक्टीव आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 8 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1738 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com