MNS action viral saam tv
मुंबई/पुणे

MNS News: मनसैनिकांचा राडा! मराठी न बोलल्याने MNS कार्यकर्त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याला चांगलंच चोपलं, व्हिडीओ व्हायरल

MNS action viral: मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रहाने मांडत आलीये. याच भूमिकेतून पुन्हा एकदा एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबई उपनगरात मनसेच्या कार्यकर्त्यांची आक्रामक भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. सध्या मुंबईमध्ये मराठी विरूद्ध हिंदी असा वाद सुरु असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मीरा रोड परिसरातील एका फास्ट फूड हॉटेलमध्ये मराठी न बोलल्यामुळे एका कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी रात्री घडला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

कुठे घडली ही घटना?

ही घटना मीरा रोडच्या बालाजी नावाच्या फास्ट फूड सेंटरमध्ये घडली. आरोप आहे की मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला केवळ न बोलल्यामुळे कानशि‍लात लगावल्या. या मारहाणीत कर्मचाऱ्याला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचंही समोर आलं आहे.

मुंबईत मनसे कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून प्रतिक्रिया दिलीये. पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटलंय की, मराठी मुद्द्यावरून भांडणं योग्य नाही. पण जर कोणी जाणूनबुजून उद्धट भाषा वापरून मराठी बोलण्यास नकार देत असेल तर ते देखील चुकीचं आहे.

महाराष्ट्र सरकारमधील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी भाष्य केलंय की, महाराष्ट्रात प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. जर काही चुकीचं घडलं असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय की, महाराष्ट्रात मराठी आणि भारतात हिंदी, ही आमची भूमिका आहे. जर कोणी हिंसाचाराचा अवलंब करून कायदा हातात घेतला तर सरकार कठोर कारवाई करेल.

मुंबईत मराठीऐवजी हिंदी बोलल्याबद्दल मारहाणीची ही पहिलीच घटना नाही. याआधीही मनसे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी असा चोप दिला आहे. दरम्यान मीरा रोडवरील ही घटना अशा वेळी उघडकीस आली आहे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनीही एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारला हिंदी सक्तीचा आदेश रद्द करण्यास भाग पाडलंय. दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी विजयी रॅली काढणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT