Dombivali : ठाकुर्लीत मनसे-ठाकरेंची सेना एकत्र, अर्धवट उड्डाणपुलावर केलं आंदोलन

Dombivali News : डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केलं. पुलावर प्रतिकात्मक विमान, रॉकेट उडवून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.
Dombivali News
Dombivali NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. यामुळे मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशात डोंबिवली जवळील ठाकुर्ली येथील ९० फीटला जोडणारा उड्डाणपूल रखडला असून या विरोधात डोंबिवलीमध्ये देखील मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले आहे. 

डोंबिवलीतील ठाकुर्ली हा उड्डाणपूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. दरम्यान बाधितांच्या मोबदल्याअभावी हा पूल रखडल्याचे बोलले जात आहे. गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ हा पूल पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही पुलाचे काम पूर्ण झाले नाही. याबाबत मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केलं. 

Dombivali News
Akkalkuwa News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत; नदीला पूल नसल्याने झाडाची फांदी पकडत काढतात मार्ग

पुलावर उडविले प्रतीकात्मक विमान 

दरम्यान पुलावर प्रतिकात्मक विमान, रॉकेट उडवून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनात प्रतीकात्मक इन्फ्रामॅन देखील आणण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदे समर्थक यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे इन्फ्रा मॅन म्हणून बॅनर लावले होते. या पार्श्वभूमीवर मनसेने प्रतीकात्मक इन्फ्रा मॅन आणून अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. 

Dombivali News
Shahapur : रुग्णाला डोलीत टाकून 10 किलोमीटर पायपीट; दापूर माळ गावाला रस्ता नसल्याने हाल

प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना टोला 

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले की, मनसेचे माजी आमदार व नेते राजू पाटील यांनी ३० जूनपर्यंत जर या पुलाचे काम सुरू झालं नाही; तर आंदोलनाचा इशारा दिला होता. हा ब्रिज बनवण्यासाठी २००२ साली सुरुवात केली. मात्र अजूनही हा ब्रिज पूर्ण होत नाही. या पुलासाठी २४ करोड ठेकेदाराला देऊन देखील काम रखडले आहे. ब्रिजसाठी कोणते रॉकेट सायन्स लागलं त्यासाठी प्रतीकात्मक सायंटिस्ट आणि इन्फॉर्म बोलावलं आहे. त्यांच्या या ठिकाणी सत्कार केला या ठिकाणी भविष्यात उडून जावं लागेल आम्हाला हवेत उडणारे कार आणि बाईक विकत घ्यावे लागतील; असा टोला प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com