Shahapur : रुग्णाला डोलीत टाकून 10 किलोमीटर पायपीट; दापूर माळ गावाला रस्ता नसल्याने हाल

Shahapur news : पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांवर दवाखाना, बाजारहाट साठी ८ ते १० किलोमीटर पायी चालून डोंगर चढ- उतार् करीत कसारा किंवा खर्डी बाजारपेठ गाठतात
Shahapur news
Shahapur newsSaam tv
Published On

फैय्याज शेख, साम टीव्ही

 
शहापूर
: एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे याचं भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जनता रस्ता, विज, पाणी, आरोग्य सारख्या सुविधापासून वंचित आहे. यामुळे गरोदर माता असो वा अन्य गंभीर आजारी रुग्ण त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून न्यावे लागत आहे. अशा प्रकारे दापूर गावातून १० किलोमीटर दूरवर पायी प्रवास करण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.

शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत क्षेत्रातील दापूर माळ हा पाडा सुमारे १०० वर्षा पासून वसलेला आहे. शहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या सावरकूट पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील नागरिकांवर दवाखाना, बाजारहाट साठी ८ ते १० किलोमीटर पायी चालून डोंगर चढ- उतार् करीत कसारा किंवा खर्डी बाजारपेठ गाठतात. सद्या पावसाळा असल्याने या पाड्यात पोहचणे अशक्य होत आहे. 

वृद्धाला डोलीत टाकून १० किमी पायपीट 

दापूर माळ येथे राहणारे चिमा पारधी ह्या वृद्ध ग्रामस्थांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी गावापासून मुख्य रहादारीच्या रस्त्यापर्यत यायला १० किलोमीटरचा पायी पल्ला गाठायचा होता. अशा वेळी गावातील तरुण व नातेवाईकांनी डोली तयार करून आजारी वृद्ध चिमा पारधी यांना डोलीत टाकून डोंगर दरींतून पायी घेऊन हे नातेवाईक पावसाचा सामना करीत माळ गावठा या मुख्य रहदारीच्या गावाकडे निघाले.  

Shahapur news
Vitthal Rukmini Darshan : व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठल मंदिर समितीवर येतोय दबाव; व्हीआयपी दर्शन बंद बाबत जिल्हाधिकारींनी काढले आदेश

अनेक अडचणींचा सामना 

मात्र दहा किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी या ग्रामस्थ व वृद्धाच्या नातेवाईकांनी अनेक अडचणीचा सामना करत माळ गावठा गाठला व माळ गावातून चिमा पारधी यांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मूलभूत सुविधापासून वंचित असलेले दापूर माळ गाव आजपर्यत या गावाचा विकास झालेला नाही. रस्ता नाही, लाईट नाही, त्यामुळे अचानक झालेली आपत्ती, घटना असेल तर मोठा प्रश्न उपस्थित होतो. तर दवाखाण्यात पोचवायचं कसं हा प्रश्न उपस्थित होतो. 

Shahapur news
Akkalkuwa News : शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत; नदीला पूल नसल्याने झाडाची फांदी पकडत काढतात मार्ग

पायवाटेच्या रस्त्यावर पडले मोठे झाड


दरम्यान चिमा पारधी या रुग्ण वृद्धाला दहा किलोमीटर डोलीत पायी घेऊन  रुग्णालयात निघालेल्या ग्रामस्थांनी दापूर पासून 5 किमी अंतर कापल्यावर अचानक रस्त्यावर मोठे झाड आडवी पडले व पाय वाट देखील बंद झाली  अशा वेळी डोली घेऊन निघालेल्या लोकांनी वृद्ध चिमा पारधी यांना डोली सह उचलून घेत पडलेल्या झाडावर वर चडून खाली उतरून पुढील प्रवास सुरु केला. व वृद्ध रुग्णालय इच्छित रुग्णालयात दखल केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com