Vitthal Rukmini Darshan : व्हीआयपी दर्शनासाठी विठ्ठल मंदिर समितीवर येतोय दबाव; व्हीआयपी दर्शन बंद बाबत जिल्हाधिकारींनी काढले आदेश

Pandharpur News : देवाच्या व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश मंदिर समितीला दिले आहेत
Vitthal Rukmini Darshan
Vitthal Rukmini DarshanSaam tv
Published On

पंढरपूर : विठ्ठल रक्मिनी दर्शनासाठी आता भाविकांची गर्दी होऊ लागली होती. या गर्दीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आदेश काढले आहेत. 

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविक मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. सात दिवसांवर आषाढी यात्रा असल्याने आता या संख्येत वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत दूरवरून आलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ चांगल्या प्रकारे घेता यावा; यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र काही जणांकडून व्हीआयपी दर्शनासाठी सोडण्याचा अट्टाहास केला जात आहे. तसेच राजकीय दबाव देखील आणला जात असल्याची तक्रार विठ्ठल मंदिर समितीवर आणला जात आहे.

Vitthal Rukmini Darshan
Sindhudurg: भीषण अपघातात दोन्ही ST बसचा चुराडा, समोरासमोर धडक अन् १०० फुटापर्यंत फरपटत नेलं

सर्व भाविकांना एकसमान दर्शन 
देवाच्या व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश मंदिर समितीला दिले आहेत. २०१० मधील शासन निर्णयानुसार आता सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याचा समितीला सुचना केल्या आहेत. तर शासन निर्णयाचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्याचा मंदिर समितीला इशारा देखील दिला आहे. 

Vitthal Rukmini Darshan
Nashik : बेपत्ता तिन्ही मुलांचा लागला तपास; तलावाजवळ कपडे पाहून कुटुंब हादरले, शोधकार्य सुरु

हिंगोलीची चंद्रागाय निघाली पंढरपूरच्या वारीला
हिंगोली
: आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकऱ्यांच्या या दिंडीमध्ये श्रींचे अश्व आणि महिला व पुरुष वारकरी भाविकांचा समावेश असतो. यंदाच्या वर्षी मात्र हिंगोलीकरांसाठी पंढरपूरची वारी विशेष आहे. कारण हिंगोलीच्या वसमत शहरातील सिताराम म्यानेवार यांच्या घरातील चंद्रागाय देखील वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या वारीला निघाली आहे.  वसमतमधून निघालेल्या या चंद्रा गाईला एका स्पेशल वाहनाची व्यवस्था केली असून नातेपुते येथून हि गाय पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करणार असल्याचे या गाईचे मालक सिताराम म्यानेवार यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com