Vande Bharat Train Saam Tv
मुंबई/पुणे

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Vande Bharat Train Update: पुण्यावरून नागपूरला धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More

Summary:

  • पुणे–नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

  • अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर ट्रेन लवकर पोहोचणार

  • रेल्वे प्रवाशांचा वेळ वाचणार आणि कनेक्टिव्हिटी सुधारणार

  • सुधारित वेळापत्रक २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार

पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयींमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेस वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि कमी वेळात होईल.

पुणे ते नागपूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही महाराष्ट्रातील १२ वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या सार्वजनिक वेळेमध्ये अंशतः सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस अजनी आणि पुणे दरम्यान धावते. सुधारित पीपीटीनुसार, ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या प्रमुख स्थानकांवर तिच्या विद्यमान वेळापत्रकापेक्षा लवकर धावेल.

सुधारित वेळेनुसार, अकोला, बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर या ट्रेनचे आगमन आणि प्रस्थान वेळा लवकर असतील ज्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल. सुधारित वेळापत्रक २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल. सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन अकोला आणि बडनेरा रेल्वे स्थानकांवर सुमारे १० मिनिटे लवकर पोहोचेल आणि निघेल आणि वर्धा स्थानकावरही वेळेच्या आधी पोहचेल.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुधारीत वेळापत्रकामुळे ट्रेनच्या एकूण वेळेमध्ये आणि कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे - अजनी वंदे भारत एक्स्प्रेसचे नवीनतम सार्वजनिक वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेनचे वेळापत्रक तपासूनच प्रवाशांनी प्रवास करावा असा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

SCROLL FOR NEXT