Shruti Vilas Kadam
काकडी आणि अलोवेरा हे दोन्ही त्वचेसाठी थंडावा देणारे आणि सौम्य घटक आहेत. केमिकलयुक्त फेस वॉशऐवजी घरगुती पर्याय वापरल्यास त्वचेची नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.
½ कप किसलेली काकडी, 2 टेबलस्पून ताजा अलोवेरा जेल, 1 टीस्पून गुलाबपाणी (ऐच्छिक), 3–4 थेंब टी ट्री ऑइल (तेलकट त्वचेसाठी)
किसलेली काकडी मिक्सरमध्ये वाटून रस काढा. त्यात अलोवेरा जेल मिसळा. गुलाबपाणी आणि टी ट्री ऑइल घालून मिश्रण नीट एकजीव करा. स्वच्छ बाटलीत भरून फ्रिजमध्ये ४–५ दिवस साठवू शकता.
चेहरा ओला करून तयार मिश्रण हलक्या हाताने १–२ मिनिटे मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवा. दिवसातून १–२ वेळा वापरू शकता.
त्वचेला नैसर्गिक थंडावा, अतिरिक्त तेल नियंत्रण, पिंपल्स कमी होण्यास मदत, त्वचा मऊ आणि तजेलदार बनते
हा फेस वॉश कोरडी, तेलकट आणि संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित आहे. विशेषतः उन्हाळ्यात त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतो.
नवीन घटक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचेवर खाज, जळजळ किंवा अॅलर्जी वाटल्यास वापर थांबवा.