Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?

Tejas Express: भारतामधील पहिली खासगी ट्रेन जी नवी दिल्ली ते लखनऊ या रेल्वे स्थानकांदरम्यान धावते. देशातली सुरफास्ट असणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत या ट्रेनचे तिकीट किती आहे ते वाचाव.
Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?
Tejas ExpressSaam Tv
Published On

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकार आणि आरामदायी व्हावा त्यांचसोबत त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न केले जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी दरवेळी चांगले उपक्रम राबवले जातात.राष्ट्रीय वाहतूक कंपनीने २०१९ मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी देशातील पहिली खासगी ट्रेन सुरू केली. ही ट्रेन पूर्णपणे भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे (IRCTC) चालवली जाते आणि त्याची देखभाल देखील केली जाते.

तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे. ही ट्रेन देशातील सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक असलेल्या नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावते. ४ ऑक्टोबर २०१९ पासून तेजस एक्स्प्रेस धावू लागली. या ट्रेनने याच दिवशी पहिली व्यावसायिक धाव सुरू केली. एका महिन्यात आयआरसीटीसीने तेजस एक्स्प्रेसच्या सेवेतून जवळपास ७.७३ लाख रुपयांचे उत्पन्न केले.

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?
Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

लाँच झाल्यानंतर पाच वर्षांनीही भारतातील पहिली खासगी ट्रेन राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेस सारख्या त्याच मार्गावर धावणाऱ्या इतर प्रीमियम सेवांपेक्षा जास्त भाडे आकारते. आयआरसीटीसीच्या नवी दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि या प्रीमियम गाड्यांच्या तिकिटांच्या किमती नेमक्या किती आहेत ते आपण पाहणार आहोत...

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?
Vande Bharat Sleeper Train: नव्या 'वंदे भारत' स्लीपर ट्रेनची पहिली झलक, हे 10 इनसाइड फोटो पाहा

नवी दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणाऱ्या आयआरसीटीसी तेजस एक्सप्रेसमध्ये दोन प्रकारच्या आसन पर्याय आहेत. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार. त्याचप्रमाणे शताब्दी आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्येही तेजस एक्स्प्रेसप्रमाणेच आसन पर्याय आहेत. लांब पल्ल्याची ट्रेन असल्याने राजधानी एक्सप्रेसमध्ये फक्त एसी स्लीपर क्लासची सुविधा आहे.

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?
Mumbai Local Train: परतीच्या पावसानं बिघडवलं रेल्वेचं वेळापत्रक; मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

आयआरसीटीसी तेजस एक्स्प्रेसमध्ये नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यानच्या प्रवासाचे भाडे एसी चेअर कारसाठी १,६७९ रुपये इतके आहे. तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २,४५७ रुपये इतके आहे. त्याच मार्गावर धावणाऱ्या शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांसाठी एसी चेअर कारचे भाडे १,२५५ रुपये आहे. तर शताब्दीसाठी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे १,९५५ रुपये आणि वंदे भारत एक्स्प्रेससाठी २,४१५ रुपये इतके आहे.

या तुलनेमध्ये नवी दिल्ली-दिब्रूगड दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे तिकीच एसी थर्ड टियर, एसी सेकंड टियर आणि एसी फर्स्ट क्लासमध्ये राहण्याची सुविधा देते. ती नवी दिल्ली आणि लखनऊ दरम्यान प्रवासासाठी एसी थर्ड टियरसाठी १,५९० रुपये,एसी सेकंट टियरसाठी २,१०५ रुपये आणि एसी फर्स्ट क्लाससाठी २,६३० रुपये भाडे आकारते.

Private Train: भारतातील पहिली खासगी ट्रेन! राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत तिकीटाचे दर किती?
Matheran Mini Train: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून माथेरानची राणी पुन्हा धावणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com