Matheran Mini Train: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून माथेरानची राणी पुन्हा धावणार

Neral- Matheran Toy Train Start From 1st November: माथेरानची राणी म्हणून ओळखळी जाणारी मिनी ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. मिनी ट्रेन १ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी सुरु होणार आहे.
Matheran Mini Train
Matheran Mini TrainSaam Tv
Published On
Summary

माथेरानची राणी पुन्हा एकदा सुरु होणार

१ नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन होणार सुरु

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी

राज्यात काही दिवसातच थंडीला सुरुवात होणार आहे. थंडीत अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. थंडीत छान सकाळी धुक्याची चादर पसरलेली असते. यावेळी छान माथेरान, महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करतात. त्यात वीकेंडला फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. मुंबई पुण्यापासून अवघ्या २ तासाच्या अंतरावर असलेल्या माथेरानला तर पर्यटक नेहमी भेट देत असतात. दरम्यान, माथेरानला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता माथेरानची मिनी ट्रेन सुरु होणार आहे.

Matheran Mini Train
Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

माथेरानची राणी पुन्हा सुरु होणार

माथेरानची मिनी ट्रेन हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या ट्रेनचा प्रवास खूप खास असतो. या ट्रेनमधून तुम्ही पूर्ण माथेरान फिरु शकतात. दरम्यान, ही ट्रेन पावसाळ्यात बंद असते. दसऱ्याला सुरु होते. मात्र, यंदा पावसाळा ऑक्टोबर महिन्यात लांबला त्यामुळे ही ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही ट्रेन सुरु होणार आहे.

१ नोव्हेंबरपासून नेरळ ते माथेरान अशी मिनिटी ट्रेन सुरु होणार आहे. नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ट्रेन सुरु केली जाणार आहे. दरम्यान, मिनी ट्रेनच्या मार्गावर कामदेखील सुरु आहे. पावसाळ्यात मिनी ट्रेनच्या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. याचसोबत काही भागात सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे.

माथेरानच्या ट्रेनचा ऐतिहासिक वारसा

माथेरानची मिनी ट्रेन १९०७ रोजी ब्रिटीश काळात सुरु करण्यात आली होती. सर आदमजी पिरभाय यांनी ही ट्रेन सुरु केली होती. ही ट्रेन दरवर्षी पावसाळ्यात बंद होते आणि चार महिन्यांनी सुरु होते. यंदा ही ट्रेन सुरु होण्यास महिनाभर उशिर झाला आहे.

Matheran Mini Train
Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com