Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

Raigad Matheran News : सुट्या असल्याने माथेरान येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अशाच प्रकारे कर्नाटकमधील शानमुग हे १५ ऑक्टोबर रोजी माथेरान येथे पर्यटनाच्या निमित्ताने आले होते.
Matheran News
Matheran NewsSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: माथेरानमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. माथेरान येथील किंग जॉर्ज पॉईंटजवळ सुमारे ७०० ते ८०० फुट खोल दरीत छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्युचे कारण अजुन स्पष्ट झाले नसून या बाबत माथेरान पोलिस तपास घेत आहेत.  

कर्नाटक येथील शानमुगा सुंदरम (वय ५८) असे मृत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. दरम्यान सुट्यांचा कालावधी असल्याने सुटी घालविण्यासाठी अनेक जण फिरण्याच्या निमित्ताने पर्यटनस्थळांवर जात असतात. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे देखील पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशाच प्रकारे कर्नाटकमधील शानमुग हे १५ ऑक्टोबर रोजी माथेरान येथे पर्यटनाच्या निमित्ताने आले होते.

Matheran News
Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

फिरण्यासाठी गेले ते परतलेच नाही 

लॉजवर थांबले असताना दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे १६ ऑक्टोबरला ते फिरायला बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते लॉजवर परतले नव्हते. यामुळे लॉजिंग प्रशासनाने शानमुग सुंदरम हे पर्यटक बेपत्ता झाल्याची तक्रार माथेरान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने तपासाला सुरवात केली होती. तर फिरण्याच्या मुख्य पॉइंटवर देखील त्यांची शोधाशोध सुरु झाली होती. 

Matheran News
Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

तीन दिवसांनी आढळला मृतदेह 

तपासा दरम्यान शानमुग सुंदरम यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अशा अवस्थेत किंग जॉर्ज पॉईंट जवळील खोल दरीत सापडून आला. मृतदेहासोबत असलेल्या ओळख पत्रावरून ओळख पटली आहे. स्थानिक नागरीक, हेल्प फाऊंडेशन, खोपोली आणि डेला ॲडव्हेंचर टिमने शोधकार्य केले. दरम्यान मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com