Zika News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Zika Virus Update: पुण्यात झिकाचा धोका वाढला, आणखी एकाला लागण; रुग्णसंख्या १६ वर

Pune Zika Virus Patient: पुण्यामध्ये झिका व्हायरस वेगाने पसरत आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. पुण्यात रोज झिकाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुणेकरांची (Punekar) चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये झिका व्हायरस (Zika Virus) वेगाने पसरत आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यामध्ये झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. त्यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. एरंडवणे भागात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या ३८ वर्षांच्या व्यक्तीला झिकाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. पुण्यातील झिकाच्या १६ रुग्णांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. यामध्ये गर्भवती महिला देखील आहेत. अशामध्ये पुण्यात झिकाचे रुग्ण वाढत असल्याने डासोत्पत्ती रोखण्याचे पालिकेने आवाहन केले आहे.

झिकाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महानगर पालिकेचे टेन्शन वाढले आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.याबाबत पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेकडून झिकाची लक्षणं दिसणाऱ्या नागरिकांच्या रक्ताच्या नमुण्यांची तपासणी केली जात आहे. हे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT