Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: रक्षाबंधनाआधीच बहीण-भावाची ताटातूट, अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू, बहिणीची मृत्यूशी झुंज

Pune Bike And Car Accident: पुण्यामध्ये भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

पुण्यामध्ये अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यातल्या येरवड्यामध्ये भरधाव कारने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. बहिणीला कॉलेजमध्ये सोडायला जात असताना हा भयंकर अपघात झाला. या अपघातामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. रक्षाबंधनापूर्वीच बहीण-भावाची ताटातुट झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवड्यातील लक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या अजिंक्य राजू गायकवाड (वय २२ वर्षे) याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. तर त्याची बहीण अनुष्का गायकवाड ही अपघातामध्ये गंभीर जखमी झाली. सोमवारी सकाळी अजिंक्य आपल्या लाडक्या बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जात होता. वाटेमध्ये अनर्थ घडला. त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला. तर अनुष्काला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की, अजिंक्य दुचाकीवरून बहिणीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी जात होता. दोघेही कॉलेजजवळ पोहचले. त्याचठिकाणी त्यांच्या दुचाकीला कारने उडवले. पुणे-सेंड मिरज कॉलेजजवळ नो-पार्किंगमधून एक कार वेगाने आली. या कारने अजिंक्यच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. तर अजिंक्यचा जागीच मृत्यू झाला. अनुष्काची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. तर मृत्यू झालेल्या अजिंक्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटंबीयांकडे सोपवण्यात आला. या अपघातामुळे अजिंक्यच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Utsav 2025 : गणेशोत्सवात लेसर बंदी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार फौजदारी कारवाई

धक्कादायक! पुण्यात वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर तरुणीने संपवले आयुष्य; नेमकं मध्यरात्री काय घडलं?

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Raksha Bandhan: भावाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडे का जाऊ नये? धार्मिक ग्रंथांमधून समोर आलं महत्त्वाचं कारण

Pune To Dadar: पुण्याहून दादरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT