RBI Repo Rate: होम लोन, कार लोन स्वस्त होणार; RBI पुन्हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

RBI Repo Rate Cut: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण बैठक सुरु आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये कमी होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. जर रेपो रेट कमी झाला तर होम लोन, कार लोन स्वस्त होणार आहे.
Home Loan
Home LoanSaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. आरबीआयची पतधोरण बैठक सुरु आहे. ही बैठक ६ ऑगस्ट म्हणजे उद्या संपणार आहे. उद्या पतधोरण बैठकीनंतर महत्त्वाची घोषणा होऊ शकते. यामध्ये रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे.

रेपो रेट कमी होणार? (Repo Rate Will Decrease)

या पतधोरण बैठकीत रेपो रेट आणखी कमी होण्याची शक्यता आहे. रेपो रेट ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान याचवर्षी तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. एकूण १ टक्के रेपो रेटमध्ये कपात झाली आहे.

Home Loan
Bank Holidays In June: जून महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद; RBI ने जारी केली सुट्ट्यांची यादी

सध्या रेपो रेट ५.५० टक्के आहे. त्यात आणखी कपात झाली तर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.रेपो रेटमध्ये कपात झाली की त्याचा थेट परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होणार आहे. होम लोन, कार लोनमध्ये कपात होणार आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक फायदा होईल.

होम लोन होणार स्वस्त (Home Loan Get Cheaper)

रेपो रेट कमी झाल्यावर त्याचा थेट परिणाम होम लोनवर होणार आहे. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या रेपो रेटवर बँकांचे व्याजदर ठरते. जर रेपो रेटमध्येच कपात झाली तर होम लोनवरील व्याजदरदेखील कपात होणार आहे.

Home Loan
Home Loan: ३० लाखांचं होमलोन घेतलंय?, आता EMI चा हफ्ता किती कमी होणार?

एका अहवालानुसार, व्याजदरात कपात झाली तर लवकरच दिवाळी येऊ शकते. आता सणासुदीचेही दिवस सुरु होणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात पत वाढीला चालना मिळते. याकाळात जर रेपो रेट कमी झाला तर अजून फायदा होईल. ऑगस्ट २०१७ मध्ये रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात केल्यावर दिवाळीच्या अखेरीस क्रेडिट ग्रोथ १,९५६ अब्ज रुपयांनी वाढला होता. दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. या काळात ग्राहकांचा खर्च वाढतो. दिवाळीपूर्वी जर व्याजदरात कपात झाल्यामुळे कर्ज घेण्याचा दरही सुधारतो.

Home Loan
Tractor Subsidy Scheme: अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दारी येणार ट्रॅक्टर; सरकार देणार ४०% अनुदान, जाणून घ्या योजनेची A To Z माहिती
Q

रेपो रेट काय आहे?

A

रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेद्वारे ठरवला जातो. त्याच्या आधारावर बँका कर्जावरील व्याजदर ठरवतात.

Q

आतापर्यंत रेपो रेट कितीने कमी झाला?

A

या वर्षभरात तीन वेळा रेपो रेट कमी झाला आहे. रेपो रेटमध्ये एकूण १ टक्क्यांनी कपात झाली आहे.

Q

रेपो रेट कमी झाल्यावर काय होते?

A

रेपो रेट कमी झाल्यावर होम लोन, कार लोन, वैयक्तिक कर्ज कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com