Pune Dam Water Level Latest Update  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Supply: पुणेकरांवर पाणीसंकट! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला; आता किती टक्के पाणी शिल्लक?

Pune Water Issue: खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीची टांगती तलवार आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर पाणीकपातीचा निर्णय घेतला जाईल.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यावर पाणीसंकट आहे कारण पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीची (Pune Water Cut) टांगती तलवार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिना संपत आला असतानाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये म्हणजे चारही धरणामधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या चारही धरणांमध्ये फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दररोज ०.०५ टीएमसी म्हणजे १४७० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. याप्रमाणे दर महिन्याला १.५० टीएमसी पाण्याचा वापर पुणे शहरासाठी होतो.

जून महिना अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. या पालखी सोहळ्यामुळे अर्धा टीएमसी पाणी कॅनॉलमधून सोडावे लागते. त्यामुळे पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तरी ३० जुलैपर्यंत हे पाणी पुरेल एवढं पाणीपुरवठा नियोजन केलं असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुण्यामध्ये आणि धरण क्षेत्र परिसरामध्ये अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणांमधून पुण्याला पाणी पुरवठा केला जातो. चारीही धरणात मिळून फक्त ३.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल होणार आमदार? पाहा Exit Poll

Pune Crime: पुण्यात नववीत शिकणाऱ्या मुलाचा गळा चिरला, १४ वर्षीय पोराचं धक्कादायक कृत्य

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

SCROLL FOR NEXT