Maharashtra Rain: मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस

Maharashtra Rain Update: राज्यात जोरदार पावसाळा सुरुवात झाली आहे. यातच हवामान विभागाने कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस
Maharashtra Rain UpdateYandex

मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असल्याची माहिती हवामान विभागनं दिली आहे. राज्यात यंदा लवकर दाखल झालेला मान्सूनने सरासरी वेळेच्या आठ दिवस उशिरा राज्याच्या सर्व भागात पोहोचला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

सिंधुदुर्गात दमदार पाऊस सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून दमदार पाऊस झाला. मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रही खवळलेला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.

मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस
Kangana Ranaut Video: कंगना रणौतची महाराष्ट्र सदनाकडे अजब मागणी, मुख्यमंत्री शिंदेंशी काय आहे कनेक्शन?

रिधोरा ते पांगराबंदी रस्त्याची दुरावस्था, पावसामुळे रस्ता झाला चिखलमय

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा ते पांगराबंदी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पावसामुळे या संपूर्ण रस्त्यावर चिखल साचलाय. पांगराबंदी हे वाशिम जिल्ह्यातील शेवटचं गाव असून या गावाला जाणयासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे नागरिकांना ये -जा करताना मोठा त्रास होत असून अनेक दुचाकी चालक चिखलामुळे या रस्त्यावरून घसरून पडलेत.

अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पांगराबंदी येथील सरपंच गणेश सांगळे यांनी केला आहे.

मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस
OBC Death Leader Threat: खळबळजनक! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांना जिवे मारण्याची धमकी

शेताला तलावाचे स्वरूप

बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसाने परिसरातील ओढ्यांना पूर आल्याने शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतातील मातीसह पेरलेले शेत पिकासह वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com