Pune Water Supply Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Cut : भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट; येत्या गुरुवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Cut News Today : पुणेकराचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, भरपावसाळ्यात गुरुवारी (ता.२५) शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणेकराचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, भरपावसाळ्यात गुरुवारी (ता.२५) शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असं आवाहन करण्यात आलंय.

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने (Pune Water Supply News) दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट मेट्रो स्थानकाच्यासमोर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही ६०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी पर्वती जलकेंद्रामधून एमएलआर टाकीवरून भवानी पेठेकडे जाते. त्यामुळे पाण्याची मोठी नासडी होत आहे.

पाणीगळती थांबवण्यासाठी येत्या गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये पाणीपुरवठा बंद (Pune Water Cut News) राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा उशिराने तसेच कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच पुरेसे पाणी भरून ठेवावे, असं आवाहन करण्यात आलंय.

कोणकोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट, महात्मा फुले पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडीयम, घोरपडे पेठ या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहिल.

त्याचबरोबर लक्ष्मीनारायण टॉकीजमागील काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा देखील २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT