Pune Water Shortage News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! पुढील १० दिवस शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत, कोणत्या भागावर होणार परिणाम? वाचा A टू Z माहिती

Pune Water Supply Cut News : पुणे शहरातील काही भागांत पुढील ८ ते १० दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार असून मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीटंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील काही भागांत ८ ते १० दिवस पाणीपुरवठा ठप्प

  • पवना धरण–चिखली जलशुद्धीकरण केंद्राची मुख्य पाईपलाईन फुटली

  • हजारो लिटर पाणी वाया गेल्याने पाणी संकटाची शक्यता

  • महापालिकेचे नागरिकांना पाणी जपण्याचे आवाहन

अक्षय बडवे, पुणे

राज्यात थंडी कमी होऊन उकाडा वाढत आहे. मात्र उन्हाळा सुरु होण्यापूर्वी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. पुण्यात पुढील ८ ते १० दिवस काही भागांत पाणी पुरवठा ठप्प होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. पुणे महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या मतानुसार, पवना धरणातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वाहून नेणारी ७०० मिमीची मुख्य पाईपलाईन अचानक फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले, ज्यामुळे पुणेकरांवर पाणी संकट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ज्या भागात पाईपलाईन फुटली आहे, तो भाग दुरुस्तीसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे. नाल्यात पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने यंत्रसामग्री आणि कामगारांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे काम पूर्ण होण्यासाठी किमान १० दिवस लागू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Nachni Idli Recipe: नाचणीची मऊसूत इडली कशी बनवायची? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर

SCROLL FOR NEXT