Mumbai Crime : धक्कादायक! फक्त ४०० मीटरसाठी घेतले ₹१८०००, अमेरिकन महिलेला मुंबईच्या टॅक्सी चालकानं लुबाडलं

Mumbai Crime News : मुंबईत अमेरिकेहून आलेल्या पर्यटक महिलेकडून टॅक्सी चालकाने ४०० मीटर अंतराच्या प्रवासासाठी तब्बल १८ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Mumbai Crime : धक्कादायक! फक्त ४०० मीटरसाठी घेतले ₹१८०००, अमेरिकन महिलेला मुंबईच्या टॅक्सी चालकानं लुबाडलं
Saam Tv
Published On
Summary
  • अमेरिकन पर्यटक महिलेकडून टॅक्सी चालकाने १८ हजार रुपये घेतले

  • सोशल मीडियावरील पोस्टनंतर प्रकरण उघडकीस

  • मुंबई पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली

  • पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक कारवाईचा इशारा

मुंबई ही स्वप्ननगरी आहे. या स्वप्ननगरीत दररोज अनेक जण वेगवेगळ्या कारणांसाठी येत असतात. परराज्यातून येणारे नागरिक मुंबईत पर्यटन करण्यासाठी आग्रही असतात. मात्र याच मुंबईत बाहेरगावावरून आलेल्या पर्यटकांची लूटमार होत असल्याची घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना अमेरिकेहून मुंबईत आलेल्या महिलेसोबत घडली आहे. एका टॅक्सी चालकाने थोड्या थोडक्या अंतरासाठी शे दोनशे नाही तर तब्बल १८ हजार रुपये घेतले असल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतून मुंबईत आलेल्या महिलेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४०० मीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेल पर्यंत जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. या टॅक्सीत बसून संबंधित महिला ठरलेल्या ठिकाणी उतरली. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते संतापजनक होतं. टॅक्सी चालकाने या महिलेकडून भाडे घेताना १००,२०० नाही तर तब्बल १८ हजार रुपये भाडे घेतले.

Mumbai Crime : धक्कादायक! फक्त ४०० मीटरसाठी घेतले ₹१८०००, अमेरिकन महिलेला मुंबईच्या टॅक्सी चालकानं लुबाडलं
Today Gold Rate : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर गगनाला भिडले; प्रति तोळा १ लाख ७८ हजारांवर गेले; वाचा २२k, २४k दर

यानंतर या महिलेने सोशल मीडियावर तिचा हा अनुभव शेअर केला. या घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांनी या टॅक्सी चालकाचा शोध घेतला. शिवाय त्याला अमेरिकन महिलेकडून १८,००० रुपये आकारल्याच्या आरोपाखाली आणि फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, टॅक्सी ड्रायव्हरने महिलेला हॉटेलमध्ये सोडण्यापूर्वी काही ठिकाणी गाडी फिरवली आणि जास्त भाडे मागितले.

Mumbai Crime : धक्कादायक! फक्त ४०० मीटरसाठी घेतले ₹१८०००, अमेरिकन महिलेला मुंबईच्या टॅक्सी चालकानं लुबाडलं
Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

दरम्यान या प्रकरणी आरोपी चालकाला अटक करण्यात आली आणि तपासाचा भाग म्हणून वाहन जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील चौकशी सुरू आहे. तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसोबत पुन्हा असा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेणार असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com