मुलांच्या क्रिएटिव्हिटीला द्या पंख, १५ ऑगस्टनिमित्त घरी आणि शाळेत बनवा सुंदर 5 क्राफ्ट

Manasvi Choudhary

स्वातंत्र्यदिन

येत्या 15 ऑगस्ट 2026 ला संपूर्ण देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळा, घरे आणि परिसरात तिरंगा फडकवला जातो.

Independence Day 2026 | Picsart

क्राफ्ट

स्वातंत्र्यदिनानिमित्त बाजारात तिरंगा झेंडे, पट्ट्या , बँच, स्टिकर्स उपलब्ध असतात. मात्र या गोष्टी मुलांना बाजारातून विकत घेण्याऐवजी तुम्ही मुलांना घरी बनवायला शिका. सोप्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी घरी बनवू शकता.

15 AUGUST DIY CRAFT IDEAS FOR KIDS

साहित्य

रंगीत पेपर, आईस्क्रिमच्या काड्या, कागदी प्लेटस्, चार्ट पेपर या घरगुती साहित्यांपासून तुम्ही घरीच तिरंगा आणि इतर वस्तू बनवू शकता.

15 AUGUST DIY CRAFT IDEAS FOR KIDS

तिरंगा कागदी ध्वज

1) तिरंगा कागदी ध्वज बनवण्यासाठी केशरी, पांढरा आणि हिरवा चार्ट पेपर, निळा स्केच पेन, गम आणि आईस्क्रिमच्या काड्या हे साहित्य घ्या.

2) केशरी, पांढरा आणि हिरव्या अश्या तीन तिरंगाच्या रंगाच्या चार्टपेपरच्या पट्ट्या कापून घ्या.

3) पांढरा रंगाच्या मध्यभागी निळ्या स्केचपेनने अशोकचक्र काढा.

4) त्यानंतर या पट्ट्या आईस्क्रिमच्या काड्यावर चिकटवा.

5) अशाप्रकारे घरच्या घरी तिरंगा ध्वज तयार होईल.

Tiranga Flag

तिरंगी वॉल हँगिंग

1) जुन्या कागदी प्लेट्सचा वापर करून तुम्ही सुंदर तिरंगा वॉल हँगिंग बनवा.

2) वॉल हँगिंग बनवण्यासाठी प्लेटला तीन भागांमध्ये रंगवा.

3) त्यानंतर मध्यभागी अशोकचक्र काढा.

4) रिबन आणि कांगदी फुलांना बाजूला सजवून घ्या.

5) मागच्या बाजूला एक दोरा बांधून भिंतीवर लावा.

Tiranga Wall Hanging

हाताच्या ठशांची तिरंगी कला

लहान मुलांच्या हाताच्या ठशाने तुम्ही एक सुंदर तिरंगा पोस्ट तयार करू शकता.

1) मुलांचे तळहात केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगात बुडवून तिरंगा नक्षी काढा.

2) आईस्क्रिमच्या काड्यांपासून बनवा तिरंगा फोटो फ्रेम

3) स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही स्वत:ची फोटो फ्रेम बनवा.

4) आईस्क्रिमच्या काड्या घेऊन त्या तिन रंगामध्ये रंगवून चौकोन तयार करा. हा चौकोन चिकटवून घ्या.

Tiranga Handprint

तिरंगा फिरकी

1) रंगीत कागदापासून तिरंगी फिरकी बनवू शकता.

2) चौकोनी रंगाचा कागद घ्या. त्याचे चारही कोपरे मध्यभागी दुमडा. पिन वापरून नंतर काठीला जोडून घ्या.

3) अशाप्रकारे वाऱ्यावर उडणारी तिरंगा फिरकी तयार होईल.

Tiranga Firki

NEXT: गुडघ्यापर्यंत लांब होतील तुमचे केस! रोज नक्की लावा 'हे' एक जादुई तेल

Long Hair Tips
येथे क्लिक करा..