Pune Water Cut saam tv
मुंबई/पुणे

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष असू द्या! गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांचा समावेश?

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरामध्ये अनेक भागांमध्ये गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. पुणे महागर पालिकेकडून यासंदर्भात नागरिकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बुधवारीच पुणेकरांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला, पर्वती, वारजे, भामा आसखेड, कोंढवे धावडे आदी ठिकाणच्या जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्‍या आदी ठिकाणी तातडीच्या विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीचे काम पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाणार आहे.

गुरूवारी शहराच्या मध्यवर्ती भाग, पूर्व, पश्‍चिम भागासह बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा होणार नसल्यामुळे काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. यासाठी सहकार्य करावे आणि पाण्याची जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा परिसर खालीलप्रमाणे -

- वडगाव जलकेंद्र परीसर

- एसएनडीटी जलकेंद्र परिसर

- चतुःशृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर

- चांदणी चौक परिसर जलकेंद्र

- गांधी भवन टाकी परिसर

- लष्कर जलकेंद्र भाग

- नवीन होळकर व चिखली पंपींग भाग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandgad Vidhan Sabha : थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले चंदगड निवडणुकीत तापणार; सहा पक्षांचा कस लागणार, कोण ठरणार वरचढ?

Nikki Tamboli: अरबाज अन् मी... रिलेशनशिपच्या नात्यावर निक्की काय म्हणाली? वाचा

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Neechbhang Rajyog: नीचभंग राजयोगामुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलेन्सही वाढण्याचे योग

SCROLL FOR NEXT