Pune Metro Expansion : खूशखबर! पुण्याला मिळणार आणखी 2 मेट्रो मार्ग, जाणून घ्या कुठून कुठे धावणार? वाचा

Pune Metro Expansion News : पुण्याला आणखी दोन मेट्रो मार्ग मिळणार आहेत. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.
Pune Metro Inauguration
Pune Metro NewsSaam TV
Published On

सागर आव्हाड,साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणेकरांसाठी खूशखबर हाती आली आहे. पुण्याला आणखी नवे दोन मार्ग मिळणार आहेत. या नव्या दोन मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सुखद होणार आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे.

पुणेकरांना आणखी नवे दोन मेट्रो मार्ग मिळणार आहे. पुण्यातील खडकवासला-स्वारगेट-हडपसर- खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या मार्गावरून मेट्रो धावणार आहे. या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

Pune Metro Inauguration
Pune News : भयंकर! डोक्यात सिलिंडर घालून पतीने पत्नीला संपवलं; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

राज्य सरकारची आज सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या कॅबिनेट बैठकीत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या दोन मार्गांमुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढणार आहे. राज्य सरकारने या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी 9 हजार 897 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मर्गाची लांबी 31.63 किमी असणार आहे. तर यामध्ये 28 स्थानकांची उभारणी होणार आहे.

पुण्यातील खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असणार आहे. तसेच हा मार्ग पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे. राज्य सरकारने नव्या मार्गांना मंजुरी दिल्याने पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुखद होणार आहे.

Pune Metro Inauguration
Pune Accident: भरधाव रिक्षा कठड्याला धडकली, भीषण अपघातात माय- लेकाचा करुण अंत; मन सुन्न करणारी घटना

राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आज सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत पुणे मेट्रोसहित महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. आज मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आणखी एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com