Pune News : भयंकर! डोक्यात सिलिंडर घालून पतीने पत्नीला संपवलं; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Pune Husband Wife Crime News: चारित्र्यावर संशय घेत पतीने डोक्यात सिलिंडर घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घडली.
Pune Husband Wife Crime News
Pune Husband Wife Crime NewsSaam TV
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका निर्दयी पतीने डोक्यात सिलिंडर घालून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

Pune Husband Wife Crime News
Rajgad Fort : किल्ले राजगडावर मधमाशा चवताळल्या; पर्यटकांना कडाकडा चावल्या, अनेकांच्या तलावात उड्या

धानोरीतील मुंजोबा वस्ती लेन नंबर १० या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोहर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघामध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोला गेला की, आरोपी मनोहर याने माधुरीच्या डोक्यात सिलिंडर घातला.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नी माधुरीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माधुरीचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी मनोहर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात मित्रानेच मित्राला संपवलं

पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अगदी दोन दिवसांपूर्वी हडपसरमधील हिंगणे मळा परिसरात असलेल्या कचराकुंडीत एका तरुणाचा मृतदेह पुठ्याच्या बॉक्समध्ये आढळून आला होता. या तरुणाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. हात उसने घेतलेल्या पैशांवरून तरुणाचा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निजाम्मोद्दीन पटेल (वय २८) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Husband Wife Crime News
Sambhaji Nagar News : पोलीस उपायुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं; मन सुन्न करणाऱ्या घटनेनं संभाजीनगर हळहळलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com