Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Women T20 World Cup: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा प्रवास संपला. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठता आली नाहीये.
Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया  T20 वर्ल्ड कपमधून बाहेर
Women T20 World CupAP
Published On

युएईमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याच्या निकालावर टीम इंडियाला अवलंबून राहावे लागले होते. मात्र पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं असून भारतीय संघाला उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले आहे.

या सामन्यात जर पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली असती. परंतु नशिबाने भारतीय महिला संघाची साथ दिली नाही. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी पराभव केला.

पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात न्युझीलंडने विजय मिळवत महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली. न्युझीलंड उपांत्य फेरीत पोहचणारा संघ आहे. ग्रुप अ मधून दोन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. पहिला संघ ऑस्ट्रेलिया आहे. विश्वचषकात न्यूझीलंडचा प्रवास खूप चांगला राहिला. त्यांनी ग्रुप स्टेज दरम्यान खेळलेल्या चारपैकी तीन सामने जिंकलेत. त्यांचा फक्त ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.

Women T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवाने भारताच्या स्वप्नांवर पाणी; टीम इंडिया  T20 वर्ल्ड कपमधून बाहेर
Virat Kohli Record: कसोटीत इतिहास रचण्यापासून विराट अवघ्या 53 धावा दूर! दिग्गजांना मागे सोडणार

भारत आणि न्यूझीलंडशिवाय पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत होता.मात्र, न्यूझीलंडने दिलेल्या 111 धावांच्या लक्ष्याचा त्यांना 10.4 षटकांतच पाठलाग करावा लागला. या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानने एकूण 8 झेल सोडले. त्याने या सामन्याच्या 5व्या, 6व्या, 8व्या, 16व्या आणि 18व्या षटकात प्रत्येकी एक झेल सोडला. याशिवाय त्याने सामन्याच्या 20व्या षटकात तीन झेल सोडले. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनीही निराशा केली. 111 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलागही करता पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नाकीनऊ आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com