Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: खाकी वर्दीतला देवमाणूस! गोळीबार सुरु असताना जीव धोक्यात घालून वाचवला जीव; पुण्यातील घटना; पाहा VIDEO

Pune Viral video of Police Officer Save Life: पुण्यातील वारजे येथे काल संध्याकाळी गोळीबार करण्यात आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान प्रसंगावधान राखवून पोलिस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली.

Akshay Badve

पुण्यातील वारजे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने एका पोलिस कर्मचाऱ्याने पुढील अनर्थ टळला. याचं कारण की शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिन सुमारास ५ जणांच्या टोळक्याने वारजे भागात असलेल्या एका सलून च्या दुकानात जाऊन एका तरुणावर गोळीबार केला. या घटनेत २ जणं जखमी झाले.

गोळीबार सुरू असतानाच वारजे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून घटनास्थळी म्हणजेच गोळीबार सुरू असताना संबंधित पिस्तूल असलेल्या तरुणाला धरलं आणि त्याच्या ताब्यातील पिस्तूल काढून घेतलं. हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वारजे परिसरातील चैतन्य चौक येथील एका सलूनमध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेत निहाल शिंदे नावाचा तरुण हा केस कापत असताना त्याच्या डाव्या कानाला गोळी लागून जखमी झाला. तसेच सलूनमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान अमोल आढाव नावाच्या व्यक्तीला सुद्धा इजा झाली.

या घटनेत एकूण ५ आरोपींची ओळख पटली असून यातील साहिल राऊत याला वारजे पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वारजे पोलिस ठाण्यातील कर्मचारी त्या भागात पायी गस्त घालत असताना हा प्रकार घडला. २ दुचाकीवरून आलेल्या ५ जणांनी एकच सलून मध्ये प्रवेश केला. यातील एकाने त्याच्याकडील असलेल्या पिस्तुलातून शिंदेवर गोळीबार करायला सुरुवात केली.

त्याच परिसरातून पायी जात असलेल्या कर्मचाऱ्याने हे पाहिलं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आरोपीला धरून ठेवलं. यातील इतर जणं घटनास्थळावरून पळून गेले मात्र या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला पकडून ठेवलं आणि त्याच्याकडील पिस्तूल जप्त केली आणि त्यानंतर इतर पोलिस कर्मचाऱ्यांना कळवलं. ही घटना निहाल शिंदे आणि आरोपी यांच्यातील पूर्वीच्या वैमनस्यातून घडली असून, जानेवारी २०२३ मध्ये घडलेल्या एका गुन्ह्याशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manoj Jarange: २९ ऑगस्टला मनोज जरांगेंचे निर्णायक आंदोलन, फडणवीस सरकारपुढे ठेवल्या १० मागण्या?

Ladki Bahin Yojana : "आम्हाला लाभ नको!" जळगावातील हजारो महिलांचा 'लाडकी बहीण' योजनेला नकार, कारणही सांगितले

Tea and cholesterol: सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका?

SCROLL FOR NEXT