

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर २ दिवस मेगाब्लॉक
दुपारी १२ ते ३ दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद
पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवली जाणार
वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करताय तर जरा थांबा. कारण उद्या आणि परवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत पुलाच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. २३ एप्रिलला मुंबईकडे जाणारी तर २४ एप्रिलला पुण्याकडे जाणारी वाहतूक ३ तासांसाठी बंद राहिल. या कालावधीत वाहनं जुन्या महामार्गावरून वळवली जातील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेचं नियोजन करूनच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव / कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व वाहने किवळे – देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळविण्यात येतील.
तसेच, पुण्याकडे येणारी वाहतूक २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे आणि दिलेल्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाचा 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. २३ आणि २४ एप्रिल रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करताना नागरिकांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करावा असे वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.